Pune: दिवाळीनिमित्त नियमावली जाहीर; 'या' नियमांचं करावं लागणार पालन Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: दिवाळीनिमित्त नियमावली जाहीर; 'या' नियमांचं कराव लागणार पालन

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे पुणे पोलीस प्रशासनाने दिवाळी संदर्भातील नियमावली जाहीर केली आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे : दिवाळी Diwali Festival सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे पुणे पोलीस Pune Police प्रशासनाने दिवाळी संदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये यावर्षी विदेशी फटाक्यांच्या विक्रीला शहरात पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाने दिवाळी सणासाठी फटाके विक्रीचे परवाने दुकानदारांना दिले आहेत. मात्र यामध्ये काही अटीही आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या आहेत. याबाबतची नियमावलीदेखील या दुकानदारांना दिली आहे.

हे देखील पहा-

  • दुकानदारांना विदेशी फटाके विकता येणार नाहीत.

  • तसेच मुदत संपलेले फटाके किंवा शोभेच्या दारूची विक्रीही दुकानदारांना करता येणार नाहीत.

  • दुकानदारांना याशिवाय फटाकेविक्रीची मुदत संपल्यानंतर शिल्लक राहिलेले फटाके परवाना असलेल्या गोदामात परत करणे बंधनकारक असणार आहे.

  • या दुकानदारांना 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत फटाके विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • याशिवाय नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही नियमावलीमध्ये म्हटलं आहे.

  • फटाके विक्रीची परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी 50 मीटर अंतरात फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • याशिवाय आयुक्तलयाच्या परिक्षेत्रात कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटरच्या आत फटाके फोडण्यास आणि शोभेची दारू उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT