RTO MARATHI TEST FOR AUTO-TAXI DRIVERS IN MUMBAI-THANE saam tv
मुंबई/पुणे

रिक्षावाल्या भैय्यांची मराठीची परीक्षा सुरू, RTOचा मराठी न बोलणाऱ्यांवर कारवाईचा धडाका

Marathi Test for Auto-Taxi Drivers: मराठी न बोलता येणाऱ्या चालकांवर आरटीओनं कारवाईचा धडाका सुरू केलाय. अधिकारी भर रस्त्यावरच या चालकांची परीक्षा घेतायत आणि नापास झाल्यास नेमकं काय करतायत? पाहूया या रिपोर्टमधून....

Suprim Maskar

हा कारवाईचा धडाका सुरू केलाय परिवहन विभागानं...मुंबई आणि ठाण्यात भरारी पथकांनी परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सीचालकांची भर रस्त्यावर मराठी बोलण्याची परीक्षा घेण्याचा धडाका लावलाय. आरटीओ अधिकाऱ्यांच्या या परीक्षेत नापास झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांना आरटीओ अधिकाऱ्यांनी थेट नोटीसा बजावल्या आहेत. ही नोटीस दिल्यानंतर महिनाभरात मराठी नं बोलणाऱ्या भैय्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकणं बंधनकारक असणार आहे.

साम टीव्हीनंही या परप्रांतीय चालकांशी मराठीत संवाद साधून रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काय समोर आलं ते पाहूया.....दरम्यान मराठी न आल्यास कारवाईच्या होईल यामुळे काही रिक्षाचालक मराठी शिकतायत...साम टिव्हीच्या प्रतिनिधीसोबतही काही चालकांनी मराठीत संवाद साधण्याचा थोडाथोडका का असेना प्रयत्न केलाय...

तर दुसरीकडे काही मराठी न शिकणाऱ्या परप्रांतीयांची आडमुठी भूमिका कायम आहे. मराठी येत का? असा प्रश्न विचारल्यावर काही रिक्षाचालकांनी कसा त्रागा केलाय ते पाहा... परिवहन विभागानं ठिकठिकाणी परप्रांतीय चालकांसाठी मराठी प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेले असतानाही राज्यात फक्त 1 लाख 65 हजार 600 रिक्षा-टॅक्सी चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केलयं... तर मोफत प्रशिक्षणाची सुविधा देऊनही मराठी शिकण्यास उपस्थित न राहणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी काय आहे. मात्र अशा मुजोरांवर कारवाईचा धडाका सुरू झालाय. मात्र नोटीस बजावलेल्या चालकांची महिन्याभरात पुन्हा परीक्षा घेतली जाणार का? परिवहन खात्याचा हा उपक्रम सर्व चालकांना मराठी येईपर्यंत सुरूच राहणार की केवळ काही दिवसांचा खेळ ठरणार याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्लॅटच्या मेंटेनन्सवर लागतो जीएसटी, पण कधी? जाणून घ्या हाऊसिंग सोसायटीचा नियम; तुमच्यावर किती पडणार फरक?

Crime News : कॅन्सरच्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश, १८ आरोपींच्या आवळल्या मुसक्या; दिल्ली-मुंबई-नवी मुंबईपर्यंत कनेक्शन

Maharashtra News Live Update: पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जगदीश्वरा चरणी गोगावलेंचं साकडं

Friday Horoscope: प्रेमाची कबूली, आनंदाची बातमी; या 5 राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

पुण्यात राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद, 'काँग्रेस नेत्यांच्याच कॉलेजमध्ये गुंज'

SCROLL FOR NEXT