40 हजारांच्या व्याजापोटी वसूल केले 9 लाख रुपये; आजीबाईंवर भीक मागायची वेळ Saam TV
मुंबई/पुणे

40 हजारांच्या व्याजापोटी वसूल केले 9 लाख रुपये; आजीबाईंवर भीक मागायची वेळ

महेश सकट या सामाजिक कार्यकर्त्यांना अशिक्षित आजीबाईंना मदत केल्यामुळे पोलिसांनी दिलीप वाघमारे या सावकाराला बेड्या ठोकल्या आहेत.

गोपाल मोटघरे

पुणे: पुण्यातील सारसबाग मंदिरासमोर एका भिक्षा मागणाऱ्या आजीबाई कडे तिच्या परिचयातील एका व्यक्तीने चौकशी केली असता. एक अतिशय धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.  सावकारी जाचामुळे अनुसया पाटोळे या पेन्शन धारक आजीबाईला कधी सारसबाग, तर कधी आळंदी तर, कधी पंढरपूर (Pandharpur) या ठिकाणी बसून भिक्षा मागण्याची वेळ ओढवली आहे.

पुण्यातील गंज पेठेत राहणाऱ्या अनुसया पाटोळे या ज्येष्ठ नागरिक आजीबाईने चाळीस - पन्नास हजाराच्या व्याजापोटी, जवळपास नऊ लाख रुपये सावकाराला अदा केलं आहे.  मात्र आजीबाईच्या परिचयातील महेश सकट या सामाजिक कार्यकर्त्यांनी सावकारी विरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केल्यानंतर पुण्यातील (Pune Police) खडक पोलिसांनी दिलीप वाघमारे या सावकाराला बेड्या ठोकल्या आहेत. 

दिलीप वाघमारे हा सावरकार पुणे महानगरपालिकेत कचरा विभागातील कर्मचारी असून, त्याच्याकडे आजीबाई सह इतर काही जणांचे एटीएम कार्ड आणि पासबुक देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. अनुसया पाटोळे ही आजीबाई वारकरी संप्रदायातील आहे. तिचे पती हे पुणे महानगरपालिकेत कामाला होते. तिला तिच्या पतीची पेन्शन मिळायची. मात्र, सावकार दिलीप वाघमारे यांनी अनुसया आजीचे एटीएम कार्ड आणि बँक पासबुक स्वतःकडे ठेवल्यामुळे तो परस्पर आजीचे पेन्शन रक्कम पळवायचा. तरीदेखील या आजीने या क्रूरक्रर्मा सावकाराला माफ करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी माझं नुकसान भरून द्यावं आणि त्याला पोलिसांनी मोकळा करावा अशी माफक अपेक्षा या आजीबाईंनी व्यक्त केली आहे.

महेश सकट या सामाजिक कार्यकर्त्यांना अशिक्षित आजीबाईंना मदत केल्यामुळे पोलिसांनी दिलीप वाघमारे या सावकाराला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र सावकारी छळा मुळे फक्त अनुसया पाटोळे ह्या एकट्या आजीबाईचा छळ झाला नसून, तिच्यासारखे कित्येक महिलांना दिलीप वाघमारे या सावकाराने देशोधडीला लावलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

LPG Cylinder : दिवाळीपूर्वी या सरकारचा मोठा निर्णय! १ गॅस सिलिंडर मिळणार फ्री; काय आहेत नियम?

Sleep Problems: तुमची झोप नीट होत नाहीये? रोजच्या या ५ सवयींमुळं उद्ध्वस्त होतेय रात्रीची विश्रांती

Hot Chocolate Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा झटपट टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT