nalasopara, nalasopara youth, rohit yadav saam tv
मुंबई/पुणे

Nalasopara Crime News : किरकोळ कारणावरून मारहाण झालेल्या युवकाचा नालासाेपा-यात मृत्यू, तिघांचा शाेध सुरु

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहे.

चेतन इंगळे

Nalasopara News : दुचाकीच्या आरशाचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली नालासाेपारा येथे घडली. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी (nalasopara police) मारहाण करणाऱ्या संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस संशयिताचा शाेध घेताहेत अशी माहिती नालासोपारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनूसार रविवारी संध्याकाळी रोहीत यादव आणि विकेश चौधरी हे दोन युवक दुचाकीवरून (two wheeler) नालासोपारा पूर्वेला निघाले होते. ते नालासोपारा उड्डाणपूलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीच्या पुढे दुसर्‍या दुचाकीने जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीचा संशयितांचा आरोपींच्या दुचाकीच्या आरशाला धक्का लागला.

त्या दुचाकीवर तीन युवक (youth) होते. धक्का लागल्याने दुचाकीस्वारांचा वाद झाला. दुचाकीवर असलेल्या तिघांनी यादव व त्याच्या मित्रास मारहाण करायला सुरवात केली. दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असताना कुणी मध्ये पडले नाही. या मारहाणीत रोहीत यादव याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरीत नालासोपारा पुर्वेला असलेल्या पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मयत रोहीत हा नालासोपारा पुर्वेच्या संतोष भुवन येथे राहणारा होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पाेलिस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सुपे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT