Mumbai SaamTV
मुंबई/पुणे

Mumbai : 25 वर्षाच्या तरुणाने स्विगी, झोमॅटोचा कर्मचारी असल्याचे सांगत हॉटेल मालकांना लुटलं

हॉटेल व्यावसायिकांना धंदा चाळीस टक्क्यांनी वाढवून देऊ असे सांगत पैसे उकळले.

जयश्री मोरे

मुंबई: सध्या स्विगी आणि झोमॅटो (Swiggy and Zomato) वरून फूड ऑर्डर करण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये मोठे आहे. मात्र याचाच गैरफायदा घेत गुजरात मधून मुंबईत आलेल्या एका भामट्यांने मुंबई मधील अनेक नव्या हॉटेल व्यावसायिकांना फसविले आहे. हर्षकुमार संपतभाई शहा असे या 25 वर्षीय भामट्याचे नाव आहे.

हे देखील पहा -

मूळचा सुरत मध्ये राहात असलेला हर्षकुमार याने काही काळ स्वीगी मध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्याने मुंबई मधील नव्याने सुरू झालेली हॉटेल हेरून त्यांना स्वीगी आणि झोमॅटोशी करार करून आपला धंदा चाळीस टक्के ने वाढवून देऊ असे सांगत पैसे उकळण्यास सुरूवात केली.

अशा प्रकारे त्याने घाटकोपर, पवई, गोराई , बोरीवली अश्या विविध भागांतील हॉटेल चालकांना गंडा घातला होता. मात्र घाटकोपर मध्ये त्याने अश्या प्रकारे हॉटेल चालकांना फसविल्याची तक्रार दाखल होताच घाटकोपर पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत. कमावलेले सर्व पैसे रात्री बारमध्ये उडवून पुन्हा नव्याने हॉटेल चालकांना लुटण्याचा हा धंदा करीत असे आणि अंदाजे या काही दिवसात त्याने चाळीस ते पन्नास हॉटेल चालकांना अश्या प्रकारे फसविले असल्याची शंका पोलिसांना आहे. या बाबत पुढील तपास घाटकोपर पोलीस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT