मुंबई/पुणे

Thane News : रिक्षाचालकाने विद्यार्थिनीची छेड काढत फरपटत नेलं, ठाणे स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार

मुलीच्या आणि नगरसेवक संजय वाघुले यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. मात्र अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही.

साम टिव्ही ब्युरो

>> विकास काटे

ठाणे : महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण ठाणे (Thane) स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे स्टेशन परिसरात एका विद्यार्थीनीची रिक्षा चालकाने छेड काढली. त्यानंतर तिला फरपटत नेलं आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत मुलीच्या आणि नगरसेवक संजय वाघुले यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. मात्र अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही.

सीसीटीव्हीतील दृष्यांनुसार, रिक्षाचालकाने विद्यार्थीनीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतापलेल्या या विद्यार्थीनीने रिक्षा चालकाकडे जात कॉलर पकडून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने त्यानंतर तिथून पळ काढण्याच प्रयत्न केला. यात रिक्षाचालकाने तिला फरपटत नेलं. (Latest Marathi News)

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मला माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. जो कुणी यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. महिलांची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे. पेट्रोलिंग वाढवणे, गर्दीच्या आणि कॉलेज परिसरात पोलिसांचं गस्त वाढवण्याचं आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

महिलांच्या सुरक्षेचा (Women Security) प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत. याबाबत योग्य नियोजन केलं पाहिजे, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT