Revas Karanja Sea Bridge, Mumbai Alibaug Travel Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी सर्वात मोठी खुशखबर! अलिबागचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत; वाचा कधीपासून सुरू होणार नवा मार्ग?

Mumbai Alibaug Travel : मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी आता अवघ्या ४५ मिनिटांचा प्रवास शक्य होणार आहे. रेवस-करंजा समुद्री पुलाचे काम नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जाणून घ्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Revas Karanja Sea Bridge, Mumbai Alibaug Travel : मुंबईहून अलिबागला पोहोचण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रेवस-करंजा समुद्री पुलाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. उरण तालुक्यातील करंजा आणि अलिबाग तालुक्यातील रेवस यांना धरमतर खाडीवरून जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून सुरू असलेला हा प्रकल्प नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत एकूण १० किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या समुद्री पुलाचा समावेश आहे. या पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे ४५ मीटर असणार आहे. 'केबल-स्टेड गर्डर' तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे पुलाखालून मोठ्या मालवाहू जहाजांनाही सहजपणे ये-जा करता येणार आहे.

या प्रकल्पाच्या मार्गात सुमारे ६.५ हेक्टर खारफुटीचे क्षेत्र येत आहे. पर्यावरणाची कमीत कमी हानी व्हावी, यासाठी या भागात उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पाची संकल्पना १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात मांडण्यात आली होती. गेल्या सुमारे ४५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी उरणचे भाजप आमदार महेश बालदी गेल्या दहा वर्षांपासून मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

रेवस-करंजा समुद्री पुलामुळे अलिबाग, उरण, पनवेल आणि मुंबई यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. तसेच जेएनपीए बंदर, अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना अधिक चांगली जोडणी (कनेक्टिव्हिटी) मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच आयात-निर्यात व्यापार, मालवाहतूक आणि स्थानिक रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News Live Update: पुण्यात नवले ब्रीजजवळ अपघात, महामार्गावर ट्रक उलटला

Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर पालिकेकडून हातोडा, सहाव्या दिवशी कारवाई सुरूच; नामांकित हॉटेल्सना दणका

Maharashtra Fort : महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे गड, भव्यता पाहून व्हाल थक्क

Famous Actress : कुणीतरी येणार येणार गं! प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केली गुडन्यूज |PHOTOS

Weather Update: ११ राज्यात धो-धो पावसाचा अंदाज, ताशी ४० ते ५० किमीच्या वेगाने वाहणार वारे

SCROLL FOR NEXT