Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Video: मुंबईतून मराठी माणसांची हद्दपारी थांबणार? 'मराठींसाठी 50% घरं आरक्षित ठेवा', ठाकरे गटाची मागणी

Mumbai News: मराठी लोकांना घरं नाकारण्याचे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यातच आता या प्रकाराला चाप लावण्यासाठी आणि मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होऊ नये म्हणून ठाकरे गटाने थेट बांधण्यात येणाऱ्या नव्या इमारतीत मराठी लोकांना 50 टक्के घरं आरक्षित ठेवण्याचा कायदा करण्याची मागणी केलीय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईत मराठी माणसांना घरं नाकारण्याचा मुद्दा लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रचंड गाजला. त्याचा थेट फटका मुंबईत महायुतीला बसला. तर आता ठाकरे गटाचे नेते आणि मुंबई पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल परबांनी मराठी माणसांची मुंबईबाहेर होणारी हद्दपारी रोखण्यासाठी मराठी माणसाला नव्या इमारतीत 50टक्के घरं आरक्षित करण्याबाबत थेट कायदा करण्याची मागणी केलीय.

'मराठींसाठी 50% घरं आरक्षित ठेवा'

अनिल परब यांनी मागणी केली आहे की, मुंबईतील नवीन इमारतीत मराठी लोकांना 50 टक्के घरं आरक्षित करावीत. मराठी लोकांना 50 टक्के घरं आरक्षित देण्यासाठी कायदा करावा. घरं आरक्षित ठेवण्याची जबाबदारी विकासकाची असेल. घरं आरक्षित न ठेवल्यास विकासकाला 6 महिने तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा द्याव्यात.

मुंबईतच मराठी माणसांना सातत्याने घरं नाकारली जात आहेत. मराठी माणसांना मुंबईत भाड्यानेही घरं मिळणं मुश्कील झालंय. त्यामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईत मराठी माणसाचं पुनर्वसन व्हावं, यासाठी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी अशासकीय विधेयक मांडत नव्या इमारतीत 50 टक्के घरं राखीव ठेवण्याची मागणी केलीय.

खाणं-पिणं आणि जात-धर्माच्या नावाखाली मराठी लोकांना विकासकांकडून घरं नाकारण्यात येतात. हा मुद्दा लोकसभा निवडणूकीत गाजला होता. त्याचा थेट फायदा ठाकरे गटाला ईशान्य मुंबईत झाला. आता पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अनिल परबांनी पुन्हा मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही मराठी माणसांच्या घरांचा मुद्दा ठाकरे गटाला तारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT