Rape crime saam tv
मुंबई/पुणे

पुणे हादरलं! फार्म हाऊसवर नातेवाईकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतावर आणि फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराच्या (Molested a minor girl) अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. विशाल गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. (Relative sexually assaulted minor girl in farmhouse)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीची शेती आणि फार्महाऊस असून पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी दबाव येईल, असा गंभीर आरोप भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केलाय. मात्र या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण शिक्रापूर पोलिसांनी दिलं आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलीचे आई वडील कामासाठी तिथे राहतात. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून पीडित मुलीचे आईवडील कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्यांच्या नात्यातील नराधमाने अप्लवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याप्रकरणाची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलीय.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाच्या आदल्या दिवशी मिळणार ३००० रुपये, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

धोनीसोबतही असेच होतं... रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली कुणावर भडकला, मैदानावर नेमकं काय झालं?

MNC Election: संजय राऊतांची फडणवीसांसोबत थेट ११ लाखांची पैज, नेमकं कारण काय? | VIDEO

SCROLL FOR NEXT