REKHA KONDE SERIOUS ALLEGATIONS AGAINST MANOJ JARANGE PATIL saam tv
मुंबई/पुणे

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

Rekha Konde Alleges Setting Behind Azad Maidan: मराठा क्रांती मोर्चाच्या रेखा कोंडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.

Saam Tv

मराठा क्रांती मोर्चाच्या रेखा कोंडे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ५००० जणांची ट्रोलिंग करणारी एक टोळी मनोज जरांगे यांच्याकडे आहे. ५८ मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाज एकत्र आला होता आणि जगाने त्याची नोंद घेतली होती, तिथून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे न अभ्यासू व्यक्तिमत्त्व जन्माला आले ते एका लाठीचार्जमुळे. काही जणांना त्यांनी तर गायब केलं आहे, आरक्षणाच्या लढाई मधून त्यांनी समाजाला काही दिलेले नाही. ११ वे आंदोलन जे पाटोदा मध्ये झालं तेव्हा मी एक प्रश्न त्यांना विचारला पण तिथून ५००० लोकांनी ट्रोल मला अश्लीलपणे करायला सुरू झालं, असा आरोप त्यांनी केला आहे.

आम्ही अंध भक्ताची पट्टी डोळ्याला आम्ही लावली होती. वाशी मध्ये गुलाल उधळला पण हातात काही मिळालं नव्हतं. लोकांच्या विश्वासाची माती जरांगे यांनी केलं आहे. अंतिम लढाई ही फक्त टेंडरसाठी असते. साथीदारांच्या लोकांची चौकशी लागल्यावर आम्हाला कळलं. मनोज जरांगे यांच्या बॅकस्टेज जवळ आम्ही सेटिंग पाहिल्या आहेत. छुप्या चर्चा आम्ही आमच्या कानाने ऐकल्या आहेत. पाचव्या दिवशी आंदोलन संपले नाही तर अटक झाली असती असा सरकारने टोला दिला होता असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला.

माता भगिनी यांना ट्रोल करू नका अशी आमची अपेक्षा होती. गॅलेक्सी हॉस्पिटल त्यांचे आवडते आहे त्यांचे डॉक्टर त्यांना पाहिजे तसे रिपोर्ट देतात असं सुद्धा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. एकच गोधडी तीन वर्ष. गाड्या बदलल्या, भाषा बदलली पण गोधडी का नाही बदलली? मराठा समाजाने हा प्रश्न विचारायला पाहिजे होता असं सुद्धा कोंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

SCROLL FOR NEXT