kalyan Dombivli Surendra Patil saamtv
मुंबई/पुणे

Surendra Patil Arrest: फरार रीलस्टार सुरेंद्र पाटीलच्या मुसक्या आवळल्या; डोंबिवलीत दाखल होते बलात्काराचे दोन गुन्हे

reelstar Surendra Patil Arrested :दोन महिलांना भूलथापा देत बलात्कार केल्याचा आरोप असलेला रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्या पोलिसांनी नाशिकमधून मुसक्या आवळल्या आहेत. त्याला कल्याण कोर्टात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nandkumar Joshi

अभिजीत देशमुख, कल्याण

सोशल मीडिया रिलस्टार सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून अटक केली. डोंबिवलीतील मानपाडा आणि डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात बलात्कार प्रकरणात गुन्हे दाखल होते.

गुन्हे दाखल झाल्यानंतर पाटील फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर ठाणे खंडणी विरोधी पथकाला सुरेंद्र पाटील नाशिकमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथील एका हॉटेलमधून अटक केली. त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज मानपाडा पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत म्हणजेच ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका तरुणीला मुंबई एअरपोर्टला एअर होस्टेस म्हणून नोकरीला लावतो असं प्रलोभन दाखवून त्यानं तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यातही बलात्कार प्रकरणात एक गुन्हा दाखल आहे. बलात्कार केल्याची तक्रार एका घटस्फोटीत महिलेने सुरेंद्र पाटील विरोधात केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

पीडित महिलेने सुरेंद्र पाटील याच्या मालकीचा गाळा भाड्याने घेतला होता. या गाळ्यामध्ये पीडित महिला द्रोण व कागदाच्या प्लेट तयार करण्याचा व्यवसाय करत होती. मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने तिने व्यवसाय बंद केला. पाटीलकडे तिने माझी मशिनरी परत द्या अशी मागणी तिने केली. मात्र पाटीलने भाड्याची मागणी केली. त्यानंतर सुरेंद्र पाटील यांनी तुझे भाडे माफ करतो आणि तुझी मशिनरी परत करतो असे सांगत या पीडित महिलेवर बलात्कार केला, असा आरोप आहे.

दोन गुन्हे दाखल होताच सुरेंद्र पाटील हा डोंबिवलीमधून फरार होता. मात्र तो नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती खबऱ्याकडून ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून खंडणीविरोधी पथकाने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याला काल रात्री बेड्या ठोकल्या.

पुढील तपासासाठी त्याला मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. सुरेंद्र पाटील याच्याविरोधात याआधी देखील कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यांत फसवणूक, वीज चोरी, अवैधरित्या घातक शस्त्रे, बंदूक बाळगणे असे 14 गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर याआधी पोलिसांनी त्याला दीड वर्षासाठी तडीपार देखील केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT