Nitesh Rane Statement on Anil Parab Saam TV
मुंबई/पुणे

...अन्यथा साहेब ढुं* लाथ मारेल, परबांकडे वसुलीचं काम; राणेंची जीभ पुन्हा घसरली

इक्बाल सिंग चहल यांना कोण आदेश देतयं? राणेंचं घर कोणाला तोडायचं आहे? याचाही तपास व्हायला हवा.

सुरज सावंत

मुंबई : अनिल परब (Anil Parab) याच्याकडे वसूलीची खूप कामं आहेत, मालकाला त्यांना खूश करायचं असतं अन्यथा साहेब ढुंXणावर लाथ मारेल असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. जुहू येथील 'अधिश' बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या नोटीसविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली या सुनावणी मध्ये राणेंना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. सुनावणी दरम्यान याचिका निकाली काढत, महापालिकेने पाठवलेल्या नोटीशीवर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे मुंबई हायकोर्टने निर्देश दिले आहेत.

या सुनावणीनंतर आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पत्रकार परिषद घेत निर्णयाचे स्वागत केले ते म्हणाले, ' माननीय न्यायलयाचे आभार, आज सत्याचा विजय झाला आहे. सूड बुद्धीने ही कारवाई होत होती मोजक्या दोन तीन घरांसाठी पालिका कारवाई करत होती, जसं काही बाकी सगळ्या मुंबईमध्ये सर्व काही अलबेल आहे. बाकी पालिकेला काहीच कामं नाही. रस्ते, पाणी सर्व चांगलं आहे. हे सर्व राजकिय षडयंत्र सुरू असून हे चुकीचं असल्याचही ते म्हणाले.

तसंच इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांना कोण आदेश देतयं? राणेंचं घर कोणाला तोडायचं आहे? याचाही तपास व्हायला हवा कुठल्या सेना आमदाराचे इक्बालसिंग फोन यायचे त्यांना कोण आग्रह होतं ते समजावून घेण महत्वाच आहे. तसंच 353 च्या विषयी सभागृहात मी लाभार्थी असल्याचे सा़गितले, या कायद्याचा अभ्यास करा, आमच्यावर चालता चालता गुन्हे टाकत आहेत. आम्ही आमच्या लग्नाची पत्रिका द्यायला जात नाही, नागरिकांचे प्रश्न आम्ही घेऊन जातो. संजय राऊत यांना फारसं महत्व देऊ नये असा टोलाही त्यांनीही राऊतांना लगावला.

अनिल परब याच्याकडे वसूलीची खूप कामं आहेत, मालकाला त्यांना खूश करायचं असतं अन्यथा साहेब ढुंXणावर लाथ मारेल, जसा राजा तसं सरकार, वसूली अजूनही सुरूच आहे. पोलिसांचं मनोबल खचलेले आहे, अधिकारी राजकिय पदाधिकाऱ्यांसारखे वागत आहेत. येणाऱ्या दिवसात पांडे हे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचं कळतं असल्याचं राणे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'विकासकामांचा असली पिक्चर अभी बाकी है', नितीन गडकरी

Curry leaves chutney: कढीपत्त्याची 'ही' चटणी वाढावेल जेवणाची चव

IND vs NZ 2nd Test: सँटनरची 'सुंदर' गोलंदाजी! 7 विकेट्स घेत टीम इंडियाला केलं All Out; न्यूझीलंडकडे मोठी आघाडी

Indrayani: इंदू आणि फंट्या गँगने बनवला मातीचा किल्ला, 'इंद्रायणी' मालिकेत साजरी होणार अनोखी दिवाळी

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

SCROLL FOR NEXT