MPSC Saam TV
मुंबई/पुणे

MPSC News: आता तयारीला लागा! आयोगाच्या निर्णयानंतर प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?

आयोगाच्या निर्णयाचं सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

MPSC Student Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. आयोगाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. आयोगाच्या निर्णयाचं सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केलं आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत आहे. आंदोलनादरम्यान मी स्वत: विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी एमपीएससीला देखील विनंती केली होती. आयोगाने सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करत म्हटलं की, राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. एमपीएससीने आता नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांनाही मनापासून शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT