Pune Election Result Saam TV
मुंबई/पुणे

Pune Election Result : आमचे साहेब आज खासदार होणार, रविंद्र धंगेकरांच्या पत्नीला कॉन्फिडन्स; काय म्हणाल्या पाहा VIDEO

Ravindra Dhangekar Wife Statement : आमचे साहेब आज खासदार होणार, असा विश्वास रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे. पुण्यात मतमोजणीला सुरुवात होण्याआधी प्रतिभा धंगेकर यांनी रविंद्र धंगेकर यांचं औक्षण केलं.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणे लोकसभा मतदारसंघात 'यंदा कांटे की टक्कर' पाहायला मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांच्यात तगडी फाईट झाली. दोन्ही उमेदवारांनी एकमेकांविरोधात जोरदार प्रचार केला. आज निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर होणार असून कुणाचा विजय होणार, याकडे पुणेकरांचं लक्ष लागून आहे.

अशातच आमचे साहेब आज खासदार होणार, असा विश्वास रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे. पुण्यात मतमोजणीला सुरुवात होण्याआधी प्रतिभा धंगेकर यांनी रविंद्र धंगेकर यांचं औक्षण केलं. त्यानंतर त्यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला. "एक्झिट पोलवर माझा विश्वासच नाही. हा सगळा आकड्यांचा खेळ आहे", असं प्रतिभा धंगेकर म्हणाल्या.

खरतर मी निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत होते. त्यावेळी मतदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे निवडणुकीत नक्कीच आमचा विजय होणार. आमचे साहेब आज पुण्याचे खासदार होणार, असा विश्वास प्रतिभा धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर्स

पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांचा विजय होणार, असा अंदाज एक्झिट पोल संस्थांनी वर्तवला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची तयारी सुरू आहे.

दुसरीकडे रविंद्र धंगेकर हेच पुण्याचे खासदार होणार, असा कॉन्फिडन्स काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. त्यांनी देखील विजयाचे बॅनर्स लावले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. यंदाही हा गड राखण्यासाठी भाजपने अतोनात प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात जंगी सभा घेतली होती. दुसरीकडे भाजपच्या गडाला सुरूंच लावण्यासाठी राहुल गांधींनी सभा घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT