Siddhivinayak Temple 
मुंबई/पुणे

Siddhivinayak: सिद्धिविनायकाच्या प्रसादात उंदीर? किळसवाण्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ

Siddhivinayak Temple : तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाचा वाद ताजा असतानाच मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर , साम प्रतिनिधी

मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदराची पिल्लं असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे का? याबरोबरच प्रसादाच्या स्ट्रे मधील उंदराच्या पिल्लांवरून रंगलेल्या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

सर्वात श्रीमंत संस्थान तिरुपती बालाजीच्या लाडवात प्राण्यांची चरबी वापरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाचा व्हिडीओ व्हायरल झालायं.

या व्हिडीओत सिद्धिविनायक मंदिरातील महाप्रसादाच्या लाडू पॅकेट दिसत आहेत. आत चक्क उंदराची पिल्लं असल्याचा किळसवाणा प्रकार दिसतोय. यामध्ये उंदिराने लाडूचे पॅकेट कुरतडल्याचंही दिसून येतंय. त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.. तर हा प्रकार घडला असेल तर प्रसाद बनवणाऱ्यांना फटके द्यायला पाहिजेत, अशा शब्दात मंत्री मुनगंटीवारांनी संताप व्यक्त केलाय.. तर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने प्रसादात उंदिर असल्याचा दावा फेटाळलाय.

सिद्धिविनायकाच्या मंदिरात दररोज 50 हजार लाडू बनवले जातात. त्यातच सणासुदीच्या काळात लाडूंना जास्तीची मागणी असते.हे लाडू 7 ते 8 दिवस साठवून ठेवता येतात. मात्र लाडूच्या ट्रे मध्ये उंदिर आढळून आल्याने प्रसादाच्या स्वच्छता आणि शुद्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे सरकारने या किळसवाण्या प्रकाराची तपासणी करण्याची मागणी भाविकांनी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT