rasta roko at mumbai ahmedabad national highway to oppose vadhavan port palghar saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Ahmedabad Highway Rasta Roko : वाढवण बंदर विरोधात चाराेटीत रास्ता राेकाे, जाणून घ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची स्थिती

Vadhvan Port Palghar update : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

रुपेश पाटील

Palghar News :

पालघर जिल्ह्यातील हाेऊ घातलेल्या वाढवण बंदर (Vadhavan Port) विरोधात आज (गुरुवार) वाढवण बंदर संघर्ष समितीने डहाणूतील चारोटी येथे वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे केला आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प (mumbai ahmedabad national highway traffic update) झाली आहे. (Maharashtra News)

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी वाढवण बंदराच्या सर्व मान्यता प्राप्त झाल्या असून याच महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

त्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती , महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नॅशनल फिश वर्क फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती समाज संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, समुद्र बचाव मंच, समुद्रकन्या मंच सातपाटी, कष्टकरी संघटना, भूमी सेना व आदिवासी एकता परिषद व इतर समस्त बंदर विरोधी संघटना यांनी या बंदराला तीव्र विरोध दर्शवला आहे.

चारोटी येथे आंदाेलकांनी रास्ता राेकाे केला. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 55 अधिकारी आणि 780 पोलीस असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पाच आरसीएफच्या तुकड्या दोन एसआरपीच्या तुकड्यांचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT