Ramdas athawale News  Saam tv
मुंबई/पुणे

Ramdas Athawale: वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन खंडणी मागितली, कॉल रेकॉर्डही समोर; केंद्रीय मंत्री रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

Ramdas Athawale on Walmik Karad : केंद्रीय गृहमंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख प्रकरण आणि वाल्मिक कराडवर भाष्य केलं आहे. या प्रकरणातील हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणावरही भाष्य केलं.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : बीडमधील संतोष देशमुख प्रकरणाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बीडमधील या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मोठं भाष्य केलं आहे. 'वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन खंडणी मागितली आहे. या प्रकरणाचे कॉल रेकॉर्डही समोर आले आहे, असं भाष्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी बीडच्या प्रकरणावर भाष्य केलं. 'वालल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करा. संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडला आरोपी केले नसेल तर ते चुकीचे आहे. त्याला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी करून थांबू नये, असे आठवले यांनी सांगितले.

'वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच इतर आरोपींनी खंडणी मागितल्याचे समोर आलं आहे. त्याचे कॉल रेकॉर्डही समोर आले आहेत. त्याला आरोपी करावे, असे आठवले यांनी सांगितले. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ॲाफ प्रॅाफिटचा आरोप केला आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, असेही आठवले यांनी सांगितले. s

परभणी प्रकरणावर आठवले काय म्हणाले?

'बीडमधील घटना दुर्दैवी आहे. ज्याचं नाव आहे आका, त्यावर प्रसंग आला आहे बाका. बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. परभणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे, असे आठवले परभणी प्रकरणावर म्हणाले.

आगामी निवडणुकीवर आठवले स्पष्टच बोलले

रामदास आठवले म्हणाले, 'आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही स्वबळावर निवडून येणार नाही. बाकीच्या पक्षांचं मला माहिती नाही. पण आम्ही भाजपबरोबर राहणार आहोत. भाजपची स्वबळाची भाषा ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी असेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन

Sansad Ratna Award: श्रीकांत शिंदे, निशिकांत दुबेंसह १२ खासदारांना मिळणार संसद रत्न पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

Pooja Sawant: सुंदरा मनामध्ये भरली...; काळ्या फुलांच्या साडीत पूजा सावंतचा ग्लॅमरस लूक

Face Care: ओपन पोर्स कमी करुन त्वचेला कूलिंग देण्यासाठी वापरा घरी तयार केलेला हा स्पेशल वॉटर स्प्रे

पत्नीची निर्घृण हत्या केली, मृतदेहाचे ५ तुकडे पाण्याच्या टाकीत फेकले; पतीच्या भयानक कृत्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT