BMC Election update  Saam tv
मुंबई/पुणे

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

BMC Election update : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला आहे. मुंबईतून दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

रामदास आठवलेंनी महायुतीच्या जागावाटपाआधीच दोन रिपाई उमेदवारांची घोषणा

अंधेरी पूर्वमधील मरोळ येथे संजय आणि छाया खंडागळे यांची उमेदवारी जाहीर

कार्यक्रमात खासदार रविंद्र वायकर आणि आमदार मुरजी पटेल उपस्थित

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाने जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी आठवलेंनी मुंबईतील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील मरोळच्या कार्यक्रमात आठवलेंनी दोघांच्या नावाची घोषणा केली. आठवले यांनी उमेदवार घोषित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पुर्वेतील मरोळमध्ये रिपाईच्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी रिपाईंच्या उमेदवारांची नावं घोषणा करत प्रचाराचा नारळ फोडलाय. रिपाईंचे तालुकाध्यक्ष संजय खंडागळे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन रामदास आठवलेंच्या हस्ते करण्यात आलं. तर समाजसेविका छाया खंडागळे यांच्या मार्फत एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण आठवलेंच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार रविंद्र वायकर आणि आमदार मुरजीपटेल उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी रामदास आठवले यांनी महायुतीच्या जागावाटपाआधीच संजय खंडागळे आणि छाया खंडागळे यांची रिपाईंमार्फत उमेदवारी घोषित केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

रामदास आठवले हे आज सकाळी नागपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर भाष्य केलं. आठवले म्हणाले, ' काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीत फूट निश्चित आहे. लोकसभेत राज ठाकरे महायुतीत सोबत आल्याने आमचं नुकसान झालं पाहिजे. त्या प्रमाणात फायदा झाला नाही. विधानसभेत युतीत नव्हते, तेव्हा फायदा झाला. जास्त जागा निवडणून आल्यात. महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्ष असेल'.

'राज ठाकरे आल्यानं फायदा होणार नाही. काँग्रेससोबत जाणार नाही अशी कॉंग्रेसची भूमिका असेल. मोदी आणि ट्रम्प दोघेही डॅशिंग आहे. व्यापार सबंध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी निर्णय घेतला आहे. पीएम मोदींच्या निर्णयाचा भारताला फायदा होईल. आता सर्व्हे आला असून सर्वात जास्त जागा भाजप महायुतीला मिळतण्याची शक्यता आहे. उद्धव आणि राज एकत्र आले, तरी आमचा फायदाच होईल. महायुतीचा झेंडा महानगरपालिकेवर असेल, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT