Raju Shetty News, Indapur Latest News Updates, Raju Shetty's Sabha in Indapur SaamTv
मुंबई/पुणे

Indapur: पवारांच्या बालेकिल्ल्यात राजू शेट्टींचा दाैरा; उद्या महत्वपूर्ण सभा

महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी पवारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दाै-याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

मंगेश कचरे

बारामती : शेतक-यांचे (farmers) सरकारला (maharashtra government) काही देण घेणे नाही. त्यांचे विविध प्रश्न साेडविण्यासाठी सरकारला रस नसल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्या (ता. २० एप्रिल) इंदापूर (Indapur) तालुक्यातील भवानीनगर कारखान्याच्या सभेस एकत्रीत यावं असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक राजु शेट्टी (raju shetti) यांनी केले आहे. (Raju Shetti latest Marathi news)

ते म्हणाले राज्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. शेतक-यांना रात्रीची वीज दिली जात आहे आणि बाकी सगळ्या घटकांना २४ तास वीज मिळत आहे. शेतकऱ्याच्या वाट्याला केवळ आठ तास वीज दिली जात आहे. त्यात पुन्हा साडे चार तास भारनियमन आणि साडे तीन तास मिळणारी खंडीत हाेते अशा तापलेल्या उन्हात शेतकऱ्यांनी शेती करायची कशी ? उभा ऊस वाळून चालला आहे.

साखर कारखाने ऊस तोडायला तयार नाहीत. त्यामुळे अशा सगळ्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी उद्या (बुधवार) इंदापूर तालुक्यातील भवानीनगर कारखान्याच्या इथे एकत्रीत यावे असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे. दरम्यान महाविकास आघाडीतून (mva) बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी पवारांच्या (sharad pawar) बालेकिल्ल्यात पहिल्यांदा येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दाै-याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT