Raju Shetti Saam Tv
मुंबई/पुणे

ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला; राजू शेट्टींचा महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला

बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आघाडी सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे आता काही दिवसातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार स्थापन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरुन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले होते, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी करण्याची मागणी केली होती. या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे निर्देश दिले होते, पण बहुमत चाचणी अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

'महाविकास आघाडीच्या नेत्यांनो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्यांचा तुम्ही एक एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला ! देवाच्या काठीला आवाज नसतो !!' अस ट्विट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

SCROLL FOR NEXT