Vaishnavi Hagawane Saam Tv
मुंबई/पुणे

Hagawane Family : फक्त सुनाच नाहीतर वडिलांनाही सोडलं नाही, राजेंद्र हगवणेने विकृतीची सीमाच गाठली

Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणेच्या हत्येनंतर हगवणे कुटुंब चर्चेत आले आहे. राजेंद्र हगवणे यांनी वडील तुकाराम हगवणे यांचे खोटे मृत्यूपत्र बनवून सगळी मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित तरुणीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना अटक झाली होती. आज (२३ मे) वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान हगवणे घराण्याचा इतिहास समोर आला आहे.

राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशीच्या भुकूम गावचे ख्यातनाम पैलवान होते. १९८० साली ते पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर तुकाराम हगवणे सभापतीही बनले होते. २००४ साली राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुळशीतून विधानसभा लढले होते, पण निवडणूकीत त्यांचा पराभव झाला.

२००४ मध्ये राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. त्यानंतर ते जिल्हा बँकेच्या निवडणूका लढले होते. पण यात देखील त्यांना अपयश आले. हगवणे यांचा शेती आणि दुधाचा मूळ व्यवसाय होता. कालांतराने त्यांनी जमिनीचे व्यवहार, कंत्राट देखील घ्यायला सुरुवात केली. राजेंद्र हगवणे यांनी स्वत:च्याच वडिलांचे खोटे मृत्यूपत्र बनवून सगळी मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा हा घाणेरडा डाव फसला.

राजेंद्र हगवणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. ते प्रदेश कार्यकारणीवर सदस्य होते. त्यांचा मुलगा सुशील हगवणे हा युवक तालुकाध्यक्ष होता. पण हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. सध्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचे कुटुंब तुरुंगात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: खोपोलीच्या डम्पिंग ग्राऊंडला महिन्याभरात तिसऱ्यांदा आग

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT