Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

राज ठाकरे शाखांना अन् मंत्र्यांना देणार नवी पाटी, "कारभार ऐसे करवा की...''

मी सभा घेणार आहे तेव्हा इथेही सभा घेईन. ही शाखा आहे, दुकान नव्हे, इथं आल्यावर न्याय मिळायला हवा.

सुमीत सावंत

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. घाटकोपरला शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आज प्रभादेवीला उपस्थीत होते. तिथे बोलताना राज ठाकरे म्हणाले की आज काही भाषण करणार नाही. व्यासपीठावर तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे. कारण खालून दर्शन होत नाही. निवडणूक कधीही लागतील, अजून तरी या वातावरणात निवडणूक वाटत नही. लागल्यावर सगळ्यांची पाक पाक सुरु होईल, तेव्हा आमचीही सुरू होईल.

मी सभा घेणार आहे तेव्हा इथेही सभा घेईन. ही शाखा आहे, दुकान नव्हे, इथं आल्यावर न्याय मिळायला हवा. यावेळी राज ठाकरेंनी एका नव्या पाटीची घोषणा केली आहे. एक पाटी मी सगळ्या शाखेला देणार आहे. तीच पाटी प्रत्येक मंत्र्याला पाठवणार आणि ती लावायला सांगणार आहे. शिव छत्रपतींचा संदेश आहे, मंत्रालयातल्या सगळ्या भागात पाठवणार आहे. "कारभार ऐसे करवा की रयतेच्या भाजीच्या डेठालाही हात लागू नये" या संदेशाचा प्रत्येक जण तंतो-तंत पालन करेल अशी अपेक्षा राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान महानगर पालिकांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे सर्वचं पक्ष तयारीला लागले आहेत. मनसेकडून देखील शहरातल्या वेगवेगळ्या भागात शाखांची उद्घाटनं केली जात आहेत. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घाटकोपरला शाखेचे उदघाटन करून त्याची सुरुवात केली होती , त्यानंतर आता प्रभादेवीमधल्या मनसेच्या शाखेच्या उडघटनाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत .त्यामुळे मनसे कडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचं म्हटलं जातंय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT