saam tv
मुंबई/पुणे

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

Raj Thackeray visits Uddhav Thackeray at Matoshree : उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर भेटायला गेले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

  • राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर भेट दिली.

  • दोन्ही ठाकरे बंधूंच्या या भेटीमुळे शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.

  • ५ जुलै रोजीही दोघं एकत्र मंचावर दिसले होते, त्यामुळे नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

  • ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलं जात असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि राजकीय चर्चा वाढली आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray news : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज टाकरे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते, त्यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा भेट होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. ५ जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्यात दोन्ही भावांनी एकत्र येत महाराष्ट्रात नव्या राजकीय समि‍करणाचे संकेत दिले होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे-शिवसेना या युतीच्या फक्त चर्चा सुरू होत्या. पण आता दोन्ही ठाकरे पुन्हा भेटणार असल्यामुळे युतीच्या चर्चेला पुन्हा जोर धरला आहे. मागील अनेक वर्षांपासून राज ठाकरे मातोश्रीवर गेले नव्हते. पण आता उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर जात आहे. कौटुंबिक सोहळ्यासाठी हे दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत, पण यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.

उद्धव ठाकरे यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. राज्यभरातून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास नव्या राजकीय समीकरण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT