Raj Thackeray, Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

राज, उद्धव एकत्र येणार का? शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुण्यात "गणपती आमचा किंमत तुमची २०२२" या मनसेने केलेल्या आयेजित उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांनी शर्मिला ठाकरे यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का यावर प्रश्न विचारला. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Raj Thackeray Latest News)

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांनी साद घातली तर एकत्र येऊ देत, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी यावेळी दिली.

शर्मिला ठाकरे यांच्याहस्ते व रिटाताई गुप्ता यांच्या उपस्थितीत "गणपती आमचा किंमत तुमची २०२२" या शहर मनसे आयोजीत उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यात मोती चौक, सोन्या मारुती मंदिराजवळ कार्यक्रम होणार आहे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाल्या, महागाई वाढली हे दिसत नसले तर मंत्री खासदार यांचे भत्ते बंद केले पाहिजेत. कोरोना काळात माजी मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले आहे.

आम्ही कायम चांगल्या इच्छा व्यक्त करतो, रस्ते पाणी प्रश्न सुटतील. लोकांना आश्वासन देण्यापेक्षा काम करायला हवे. आरक्षण देऊन नोकऱ्या देता येत नाहीत. यावेळी पत्रकारांनी शिवसेना कोणाची असा प्रश्न केला, तेव्हा ठाकरे यांनी 'नो कॉमेंट' अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! येवला वनविभागाचे ८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये डॉक्टरची सीबीआयकडून रात्री पुन्हा चौकशी सुरू

सरकार 'या' वाहनांसाठी आणणार खास FastTag; टोलवर एकही पैसा द्यावा लागणार नाही

Janjira Fort Close : जंजिरा किल्ल्यावर जाण्याचा प्लान करत असाल तर थांबा, ३ महिने किल्ला राहणार बंद

Pune Tourism : पुण्यात लपलंय महाराष्ट्रातील 'मिनी युरोप', सह्याद्रीतील 'ही' रंगीबेरंगी स्वप्ननगरी पाहायला परदेशी पर्यटकांचीही होते मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT