Raj Thackeray on Cartoonists Account Ban 
मुंबई/पुणे

Raj Thackeray : हिटलरही व्यंगचित्राला घाबरला, आजचे सत्ताधारी.... पाहा राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray Black & White Latest News : राजकीय व्यंगचित्रकारांची सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याच्या प्रकारावरून राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सकाळ पुणे लिट फेस्टमधील मुलाखतीत त्यांनी हिटलरच्या पत्राचा दाखला देत व्यंगचित्रांचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित केले.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray on Cartoonists Account Ban : 'सकाळ पुणे लिट फेस्ट'मध्ये सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक विशेष मुलाखत घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्या सोशल मीडियावर राजकीय व्यंगचित्रकारांची खाती (Accounts) बॅन, ब्लॉक करण्याच्या प्रकारावरून सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. लोकशाहीत व्यंगचित्रांचे महत्त्व आणि जुन्या काळातील नेत्यांची अनुनयाची वृत्ती यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

पत्रकारितेत व्यंगचित्रांचे स्थान अधोरेखित करताना दिवंगत पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या एका किस्स्याचा संदर्भ देण्यात आला. कोणत्याही देशातील लोकशाही किती सक्षम आहे, हे तिथल्या वृत्तपत्रांमधील व्यंगचित्रांवरून समजते, असे पाडगावकर मानत असत, अशी सुरूवात करत निलेश खरे यांनी राज ठाकरेंना सवाल विचारला.

प्रश्न - पंधरा-वीस दिवसांपासून मोठ्या राजकीय व्यंगचित्रकारांची सोशल मीडियावरील अकाउंट्स ब्लॉक केली जात आहेत. यावरून व्यंगचित्रकारांचे व्यक्त होणे कितपत सुरक्षित आणि सक्षम राहिले आहे, हा प्रश्न निर्माण होतो. या संपूर्ण परिस्थितीकडे आपण कसे बघता?

यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "एक व्यंगचित्रकार म्हणून या सगळ्या घटनांकडे पाहिल्यास सत्ता चालवणाऱ्यांची खरी वृत्ती समजते. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जर्मनीमध्ये अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या कार्यालयात एक पत्र सापडले होते. त्या काळातील जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार 'डेविड लो' याला जिवंत किंवा मृत माझ्यासमोर आणा, असे आदेश देणारे ते पत्र होते. यावरून व्यंगचित्र किती प्रभावी ठरू शकते, हे स्पष्ट होते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते व्यंगचित्र झेलण्याची क्षमता त्या नेतृत्वात असायला हवी."

सत्तेचा कोणाकडेही अमरपट्टा नसतो!

सध्याच्या सोशल मीडियावरील अकाउंट्स ब्लॉक करण्याच्या प्रकारावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "व्यंगचित्रकारांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडे सत्तेचा काही अमरपट्टा नाही. आज सत्तेवर असलेले उद्या खाली जाणारच असतात; पण त्यांना असे वाटते की परमेश्वराने आपल्याला कायमस्वरूपी याच पदावर बसण्यासाठी पाठवले आहे, मात्र तसे नसते."

जुन्या काळातील राजकीय नेत्यांच्या सहिष्णुतेचे कौतुक करताना राज ठाकरे यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "या सर्व नेत्यांवर त्याकाळी प्रचंड टीका झाली, व्यंगचित्रं काढली गेली; पण कधीही कोणी व्यंगचित्रं बंद पाडली नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी पंडित नेहरूंवर अनेक व्यंगचित्रं काढली होती. एकदा बाळासाहेबांनी नेहरूंना त्यांचेच एक कॅरीकचर स्वाक्षरीसाठी पाठवले होते, त्यावर नेहरूंनी स्वतः 'माय बेस्ट विशेषाज टू द कार्टूनिस्ट' असे लिहून सही परत केली होती. यावरून त्या नेत्यांचा लोकशाहीवरील आदर दिसून येतो."

सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी, "टीव्ही बघत असताना अचानक इंटरनेट जावे आणि सगळं ब्लँक होऊन जावं, तशी आज आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गत झाली आहे," अशा शब्दांत तीव्र चिंता व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अग्रीपाड्यात क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; दोन बंदुकांसह १९ जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत? वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत योग्य नियम

Rinku Rajguru: अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या लेकीच्या संघर्ष; रिंकू राजगुरु लवकरच पहिल्यांदाच दिसणार अॅक्शन अवतारात

Bribe Case : रायगडमध्ये खळबळ! सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं; गुन्हा दाखल

Dum Aloo Recipe: रेस्टॉरंटसारखी चमचमीत दम आलू भाजी घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT