Raj Thackeray criticises BJP over tree cutting in Bhimashankar forest saam tv
मुंबई/पुणे

गुजरातची दोन माणसे महाराष्ट्र चालवताय; भीमाशंकरच्या वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा घणाघात

Raj Thackeray Speech Bhimashankar Forest Row : भीमाशंकरमधील जंगलात होत असल्याचा आरोप असलेल्या वृक्षतोडीवरून राज ठाकरे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर टीका केली. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय.

Bharat Jadhav

पुण्यातील भीमाशंकरमधील जंगलात होणाऱ्या वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार घणाघाती टीका केली. सह्याद्रीच्या कुशीत २३ प्रकल्प येणार आहेत. भीमाशंकरमधील जंगलतोडीसाठी कोणतेच कंत्राट काढण्यात आले नाही. गुजरातसाठी महाराष्ट्रात जंगलतोड केली जातेय. तोडलेली झाडं पाहून वाईट वाटलं. जंगलाच्या अंत्यसंस्कारासाठी आलोय असं वाटलं, असं राज ठाकरे म्हणालेत.

भीमाशंकरच्या जंगलात होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे कर्जतमध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. सरकार हे जनतेच्या भावना समजून घेत नाहीये.कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हातात काहीच नाहीये. गुजरातची दोन माणसं महाराष्ट्र चालवत आहेत. राज्यातील नेत्यांना सत्तेची आणि पदाची भीती आहे.

गुजरातसाठी महाराष्ट्रात जंगलतोड

झाडं तोडली तिथे गेलो होतो, तोडलेली झाडं ही रचून ठेवली होती, हे इतकं वाईट वाटलं मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय. इतक्या वर्षांची ती जुनी झाडं कोणत्या तरी गुजरात्यासाठी कापून टाकली जात आहेत. या प्रकल्पाची गरज काय आहे, हा सगळ्यामागे एक षडयंत्र आहे, ते समजून घेतलं पाहिजे, गुजरातची दोन माणसं महाराष्ट्र चालवत आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज्यातील नेत्यांच्या हातात काहीच नाही

अधिकारी पदावर बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील त्यांना केंद्रात बसलेले दोघेजण शुन्य किंमत देतात. आम्ही जे सांगितलं ते महाराष्ट्रात झालं पाहिजे, हा जमिनीचा तुकडा त्यांना दिलं पाहिजे, आम्ही जे सांगितलं ते झालं पाहिजे. विधानसभेला सांगितलं होतं, ही दोन माणसं वाटेल ते करतात. ही हिंमत येते कुठून, ही हिंमत येते तुमच्यामधून, अत्यंत जबाबदारीतून बोलतोय. आज रडत बसायचं, राजकीय पक्षाकडे जायचं, आमच्यावर अन्याय होतो. निवडणूक आली की जातीच्या नावावर धर्माच्या नावावर यांना मतदान करायचं, मग हे निवडून येणार आहे आणि पुन्हा,वरंवटा फिरवणार आणि ५ वर्ष तेच करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीमाशंकर जंगलतोडीवर राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांना १० रोखठोक प्रश्न, नेमकं काय म्हणाले?

Mobile Theft Prevention Settings: मोबाईल चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी सोप्या 3 सेटिंग्स, आजच करा

Ladki Bahin Yojana : १५०० रुपयात महिलांना विकत घेतलं जातंय, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या हातात काहीच नाही- राज ठाकरे

Silver Anklets for Women: महिलांसाठी 10-15 ग्रॅम चांदीमध्ये बनवा पैंजणाच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT