Raj Thackeray Aurangabad Rally News, MNS Latest News, Raj Thackeray Rally latest News SAAM TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray : औरंगाबादच्या सभेपूर्वी १००-२०० पुरोहित देणार राज ठाकरेंना आशीर्वाद

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी मनसेकडून सुरू आहे. राज ठाकरे हे पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी जाणार आहेत. तत्पूर्वी, ते आजच पुण्यात गेले आहेत. औरंगाबादच्या सभेपूर्वी राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानासमोर उद्या सकाळी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात १०० पुरोहित उपस्थित राहणार आहेत. ते राज ठाकरे यांना आशीर्वाद देतील. तसेच त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी प्रार्थना करणार आहेत, असे सांगितले जाते. (Raj Thackeray Aurangabad Rally News Updates)

राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला अखेर पोलीस प्रशासनानं परवानगी दिली आहे. त्यामुळं राज्यातील मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे हे पुण्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राज हे पुण्यात पोहोचले आहेत. पुण्याहून ते औरंगाबादला सभेसाठी जाणार आहेत. पुण्याहून ते उद्या औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातील त्यांचे निवासस्थान 'राजमहल' येथे १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत मोठा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर राज ठाकरे यांना ते आशीर्वाद देतील. तसेच पुढील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ते प्रार्थना करणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.

औरंगाबादला रवाना होणार

१०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार असून, ते राज ठाकरे यांना आशीर्वाद देतील. त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो, यासाठी पूजा सांगणार असून, प्रार्थना करणार आहेत. राज यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. उद्या सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर ते औरंगाबादला निघतील. राज ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते औरंगाबादकडे कूच करतील. त्याआधी वाढू येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतील.

राज ठाकरेंच्या सोबत १०० वाहने

पुण्यातून १०० वाहने राज ठाकरे यांच्यासोबत औरंगाबादसाठी निघणार आहेत. तसेच अन्य कार्यकर्ते सभेच्या दिवशी पुण्यातून सकाळी निघणार आहेत. दुसरीकडे ३ मे रोजी होणाऱ्या मनसेच्या महाआरतीला हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानंही पाठिंबा देण्यात आला आहे. आरतीसाठी भोंगे लावण्यात येणार असून, पोलिसांकडून परवानगी घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागप्रमुख त्यांच्या विभागांमध्ये महाआरती करणार आहेत.

Edited By - Nandkumar Joshi

व्हिडिओ पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT