Raj Thackeray MNS Complete 20 Years Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा... राज ठाकरेंची खास पोस्ट, तरूणांना आवाहन करत म्हणाले...

Raj Thackeray Social Media Post : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मराठी तरुण-तरुणींना पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • मनसे स्थापनेला २० वर्ष पूर्ण

  • रायगडावर वर्धापनदिन साजरा

  • राज ठाकरे यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट चर्चेत

  • मराठी तरुणांना पक्षात सहभागी होण्याचे आवाहन

Raj Thackeray MNS Complete 20 Years महाराष्ट्राच्या राजकारणातील परखड नेतृत्व मानलं जाणारे राज ठाकरे यांनी २० वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं छोटसं रोपटं रुजवलं. या रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या पक्षाला स्थापन होऊन आज २० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने राज ठाकरे आज रायगडावर वर्धापनदिन साजरा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी २० वर्षांपूर्वी सुरु झालेल्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देऊन महाराष्ट्राचे पाईक होण्यासाठी उद्यापासून सुरु होणाऱ्या मनसे पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी मराठी तरुण-तरुणींना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसैनिकांना २० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत राज ठाकरे म्हणाले की, २० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण २० वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं! मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या कधी यश मिळालं कधी नाही मिळालं पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येईल.

२० वर्षांत प्रचंड बदल

पुढे राज ठाकरे म्हणाले, गेल्या २० वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !

महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी

अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या १० मार्च २०२६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील ! त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arshdeep Singh: विश्वचषक जिंकल्यानंतर अर्शदीपचा जलवा! संजूला म्हणाला 'जस्टिस' मिळाला; चक्क 'गंभीर' गौतमलाही हसवले, पाहा भन्नाट रील्स!

विश्वचषकादरम्यान इशानवर दुःखाचा डोंगर; चुलत बहिणीचे कार अपघातात निधन

Sunscreen Side Effects : सनस्क्रीन वापरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाहितर त्वचेचे होईल नुकसान

Homemade Lip Mask Tips: घरीच बनवा हे 5 लिप मास्क, ओठ राहतील कायम मऊ आणि गुलाबी

Maharashtra Live News Update : राज ठाकरे रायगडावर दाखल

SCROLL FOR NEXT