Raj Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

मंबई महापालिकेसाठी राज ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये;विधानसभा निहाय घेणार बैठक

येत्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे ठाकरे काही दिवसांपासून विश्रांती घेत आहेत. पण आता येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.

आगामी मुंबई आगामी महापालिका निवडणुकीच्या ( Mumbai Municipal Corporation election)पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबई विधानसभानिहाय स्वतः आढावा बैठक घेणार आहेत. आज ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर चर्चा केली जाणार आहे.

आज ईशान्य मुंबईतील मनसे (Mumbai) पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. ही बैठक आज सकाळी १० वाजता शिवतीर्थावर होणार आहे. या बैठकीत संघटनात्मक बांधणी तसेच सध्याची पक्षीय स्थिती, स्थानिक परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच मुंबई (Mumbai) महापालिकेसाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक (Election) काही महिन्यांत होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने प्रभागनिहाय बैठका घेऊन आढावा घेतला आहे, तसेच महापालिकेच्या कामावरुन शिवसेनेवर आरोपही सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडे केले आहे, त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेही सध्या मुंबई महापालिकेसाठी सक्रीय झाले आहेत. विभागनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले आहे. आदित्य ठाकरे यांनीही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT