Raj Thackeray Latest Interview Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray Latest Interview : 'तर मी घरचं काम करायला तयार आहे..', अमृता फडणवीस यांच्या प्रश्नाला राज ठाकरे यांचं उत्तर

Raj Thackeray : 'तर मी घरचं काम करायला तयार आहे..', राज ठाकरे असं का म्हणाले?

Satish Kengar

>> भूषण शिंदे

Raj Thackeray Latest Interview : एका खाजगी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांच्यामार्फत घेतली गेली.

यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सक्रिय राजकारणात शर्मिला ठाकरे आल्या तर तुम्हाला चालेल का? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''मी घरचे काम करायला तयार आहे. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडला.'' (Latest Marathi News)

नरेंद्र मोदी उत्तम वक्ता आहेत. लाव रे तो व्हिडीओला जी धार होती, ती अजूनही तशीच आहे का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी केला. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''वेळ जर आली तर पुन्हा विरोध करेनच. प्रत्येक वेळी विरोध करण्याची गरज नाही.''

कोल्हे यांनी प्रश्न विचारला की, एखाद्यावर आरोप केले आणि त्याने जर पक्ष प्रवेश केला, तर अशा संस्थांचा वापर हा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होतोय का? यावर राज ठाकरे म्हणाले, तपास यंत्रणा काही ठिकाणी दुरुपयोग होतोय. पण अनेक ठिकाणी खरे काम सुरू आहे. मला आठवतंय, काँग्रेच्या काळात रतन टाटा यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.''

'माझे आजोबा धर्माभिमानी होते'

कोल्हे यांनी पुढे प्रश्न विचारला की, हिंदुत्वाचा अजेंडा हातात घेतल्यानंतर प्रबोधन करांचा विचार यामध्ये कधीतरी कलर होते का? यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं की, ''माझ्या आजोबांचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. एकूणच जागतिक बदल झाल्यावर तुमच्या विचारात बदल असेल तरच तुम्ही पुढे जाल. माझे आजोबा धर्माभिमानी होते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT