Dasara Melava 2024 : Saam tv
मुंबई/पुणे

Dasara Melava 2024 : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर धडाडणार, राज ठाकरे ऑनलाईन गरजणार; कोणावर निशाणा साधणार? VIDEO

Maharashtra Politics : उद्या दोन्ही ठाकरे बंधू जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्या आधी राज ठाकरे हे देखील जनतेशी बोलणार आहे. पॉडकास्ट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. तर उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून संबोधित करणार आहेत.

Tanmay Tillu

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेसमोर आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे ठाकरे, शिंदे यांच्यासोबत ऑनलाईन राज'गर्जना' होणार आहे. तर दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मेळाव्याची जोरदार तयारी देखील सुरु झालीए. त्याची चुणूक काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी अमित शाहांचा फडशा पाडणार असल्याचं सांगून भाषणाची दिशा आधीच स्पष्ट केलीय.

मात्र लोकसभेच्या मैदानात नसलेल्या आणि विधानसभेची जोरदार तयारी करत असलेल्या राज ठाकरेंना भिडणार का याकडे लक्ष आहे. तर दुसरीकडे दसऱ्याआधीच अनेक वृत्तपत्रात पहिल्याच पानावर राज ठाकरेंच्या जाहिरात छळकल्या आहेत.

यामध्ये 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारुया...मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून मनसेचे 7 उमेदवार जाहीर केलेत.

त्यामुळे उद्याच्या या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे नेस्को मैदानावर 13 ऑक्टोबरलाही मेळावा घेणार आहेत. मेळाव्यात राज काय बोलणार पाहूया.

राज ठाकरे काय बोलणार? -

- मनसे युतीत, आघाडीत की एकला चलो रे ? ची भूमिका मांडणार

- विधानसभेला मनसेचा मार्ग कोणता? हे स्पष्ट करण्याची शक्यता

- राज ठाकरे मेळाव्यातून काय संबोधणार? याकडे लक्ष

- हिंदुत्व आणि भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून राज ठाकरे काय संदेश देणार? याकडेही लक्ष लागलंय.

राज ठाकरेंनी राज्यातील बिघडलेल्या राजकारणावर वारंवार टीका केलीये. मात्र, आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानं राज ठाकरे पुन्हा एकदा या बिघडलेल्या राजकारणावर आसूड ओढण्यासाठी सज्ज झालेत. तर दर वर्षी ज्यांच्या दस-या मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा असतात त्या उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच शिवाजी पार्कवर अमित शाहांचा फडशा पाडण्याची घोषणा केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे मोदी-शाह आणि शिंदे- फडणवीसांवर काय बोलणार याकडे जसं लक्ष आहे तसंच मविआतील मुख्यमंत्रिपदावर काय भूमिका घेणार याबाबतही उत्सुकता ताणली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

SCROLL FOR NEXT