Raj Thackeray vs Uddhav Thackeray  saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप होणार? ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

raj thackeray and uddhav thackeray : विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर ठाकरे ब्रॅण्ड धोक्यात आलायं. त्यात ठाकरे बंधूंची झालेली लग्नात झालेली भेट अनेक चर्चांना सुरुवात करुन गेली. राज आणि उद्धव ठाकरे अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्र येतात की आपआपल्या वाटा वेगळ्याच ठेवतात पाहूया या रिपोर्टमध्ये...

Snehil Shivaji

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी एका लग्न सोहळ्यातल चित्र पाहून खळबळ माजली. या लग्नसोहळ्यात तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे केवळ एकत्रच आले नव्हते तर एकमेकांसोबत हास्यविनोद करत फोटोसेशन देखील करत होते. हे दृष्य पाहून ठाकरे बंधू एकत्र कधी येणार असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. या इतक्या मोठ्या घडामोडींवर संजय राऊत बोलणार नाही तर नवलच.

संजय राऊतांचे हे विधान अत्यंत महत्वाचं आहे. एकत्र येण्याचा निर्णय राज आणि उद्धव ठाकरेंचा आहे. अगदी हे दोघं वेगळे झाल्यापासून त्यांनी एकत्र येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यात त्यांचे सख्ये मामा चंदूमामा वैद्य, सामनाचे प्रकाशक दागंट, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी अशी अनेक बाळासाहेबांचे अगदी जवळचे नेते या मनोमीलनासाठी झटले. परंतू त्याला काही यश आलं नाही. गेल्या अनेक निव़डूकांमध्ये वेगळं लढूनही उद्धव आणि राज ठाकरेंचं नुकसानचं झालं. आणि या निव़डणूकीत तर ठाकरे ब्रॅण्ड संपला की काय अशी धक्कादायक आकडेवारीच समोर आली.

लोकसभा

शिवसेना

शिवसेना 23 जागा लढली

केवळ 9 जागावर विजय

मनसे

एकही जागा लढली नाही

तर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी सभा घेतल्या.

विधानसभा

शिवसेना

95 जागांवर लढली

आणि केवळ 20 जागांवर विजय

मनसे

123 जागा लढली

आणि सर्व जागांवर पराभूत

दोन्ही ठाकरेंनी गेल्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्याचं आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसतंय. जगभरातले कट्टर विरोधकही चर्चेतून मार्ग काढत वर्षानुवर्षांचा वाद मिटवतात. त्यामुळे ठाकरे बंधूंमधीलही वाद मिटू शकतो अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. त्यात महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत महाविकास आघाडी आणि महायुतीचं समीकरण पाहिलं तर राजकाणात सारंकाही शक्य असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरेही ठाकरे ब्रँडचं अस्तित्व टिकवण्यासाठी तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना टाळी देणार का याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT