sinhagad express, kalyan news saam tv
मुंबई/पुणे

Sinhagad Express News : निर्लज्जपणाचा कळस ! सिंहगड एक्स्प्रेसमध्ये करत हाेता महिलांचं शूट, प्रवाशांकडून प्रसाद (पाहा व्हिडिओ)

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan News : पुणे - मुंबई - पुणे या पुणेकरांच्या आणि मुंबईकरांच्या आवडत्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये (sinhagad express) व्हिडिओ शूटिंग करत महिलांची छेड (molested woman) काढल्याप्रकरणी रेल्वे पाेलिसांनी (railway police) संशयितास ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून महिलांचे व्हिडिओ शूटिंग करीत असल्याचा संशय काही प्रवाशांना हाेता. प्रवाशांनी आज संबंधित व्यक्तीला व्हिडिओ शूटिंग करताना रंगेहाथ पकडले.

त्यानंतर प्रवाशांनी संबंधित व्यक्तीची यथेच्छ धुलाई केली. रेल्वेतील अन्य प्रवाशांना याची माहिती कळताच त्यांनी व्हिडिओ काढणा-या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. संबंधित कल्याण रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले माेहम्मद अश्रफ यास सकाळी सिंहगड एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याबद्दलची तक्रार घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या भेटीमागचं कारण काय? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Silver Jewellery Cleaning Tips: चांदीचे दागिने घरी कसे साफ करायचे?

Health Care: बटाटे की रताळं...; रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय चांगल आहे?

SCROLL FOR NEXT