Railway  SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai Pune : उन्हाळी सुट्टीत घरी जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मुंबई-पुण्यातून तब्बल १४८४ स्पेशल ट्रेन धावणार

Mumbai Pune summer special train schedule : उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यातून तब्बल १४८४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Namdeo Kumbhar

Central Railway announces 1484 summer special trains : मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागते, त्यावेळी गावी अथवा फिरायला जायचा बेत कुटुंबाकडून आखला जातो. पण कधीकधी गर्दी जास्त असल्यामुळे ट्रेनचे तिकिट मिळत नाही. त्यामुळे खासगी वाहनाने अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करून प्रवास केला जातो. पण मुंबई-पुण्यात राहणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून १४८४ स्पेशल ट्रेन्स (Central Railway special train list) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ७४९ आरक्षित आणि ७३५ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.

मुंबई/दौंड - सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड - बडनेरा आणि हडपसर-हरंगुळ दरम्यानच्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई-बलिया, मुंबई-गोरखपूर, दौंड-कलबुरगि आणि सोलापूर-कलबुरगि/ अनकापल्ली दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे. या उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये मागणीनुसार आधीच चालवण्यात येणाऱ्या गाड्या आणि काही अतिरिक्त विशेष गाड्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई/दौंड - सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड - बडनेरा आणि हडपसर-हरंगुळ दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई-बलिया, मुंबई-गोरखपूर, दौंड-कलबुरगि आणि सोलापूर-कलबुरगि/ अनकापल्ली दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे.

या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत करतील. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामासाठी, मध्य रेल्वेने प्रवासी सुविधा वाढवल्या आहेत आणि आपल्या नेटवर्कमध्ये अनेक उपाययोजना राबवल्या आहेत.या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल. सीएसएमटी मुंबई-गोरखपूर-सीएसएमटी, एलटीटी-दानापूर-एलटीटी दैनिक विशेष,पुणे-गोरखपूर-पुणे, दानापूर-पुणे या मार्गावरही रेल्वे धावल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Tanker: भारताला मोठा दिलासा! ईराणी 'चक्रव्यूह'ला भेदून मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पाहा VIDEO

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT