railway announce mega block on sunday Central and Harbor Line mumbai local timetable ssd92 Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block News: रविवारी रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत.

Satish Daud

Mumbai Local Mega Block News

लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे. उद्या म्हणजेच रविवारी रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत. प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड ते वैतरणादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

पनवेल ते वाशी या हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, ठाणे ते पनवेल, नेरूळ ते ठाणे, नेरूळ ते खारकोपरदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकलफेऱ्या बंद राहणार आहेत.

याशिवाय सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि बेलापूर ते खारकोपरदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान शनिवारी रात्री ११.५० ते रविवार पहाटे ४.३० मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अजित पवार उद्या नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

VIDEO : टिंगरेंनी शरद पवारांसह काँग्रेस, शिवसेनेला कोर्टात ओढलं

Sangli Politics: सांगलीत मोठी राजकीय घडामोड, ठाकरेंच्या युवासेनेचा भाजपला पाठिंबा

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; २४ तास घेता येणार दर्शन

Surya Gochar 2024: सूर्याचं नक्षत्र गोचर 'या' राशींच्या जीवनात आणणार वादळ; आर्थिक अपयशही येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT