Redevelopment Of Mumbadevi Temple Area Saam Tv
मुंबई/पुणे

Redevelopment Of Mumbadevi Temple Area: ऐतिहासिक मुंबादेवी परिसराचा होणार कायापालट, विकास आराखडा तयार करण्याचे नार्वेकरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Rahul Narvekar Latest News: ऐतिहासिक मुंबादेवी परिसराचा होणार कायापालट, विकास आराखडा तयार करण्याचे नार्वेकरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Redevelopment Of Mumbadevi Temple Area: दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मंदिर आणि परिसर हा एक ऐतिहासिक आणि अनेक दृष्टीने महत्वपूर्ण असा विभाग आहे. त्याचे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्याच्यादृष्टीने मुंबई महानगरपालिकेने बृहद आराखडा तातडीने तयार करावा. विद्यमान विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिले.

विधान भवनातील अध्यक्ष यांच्या दालनात मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

यावेळी ५ एकर पेक्षा मोठा परिसर असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, मंदिराची स्वच्छता आणि सुशोभीकरण यांना प्राधान्य देणे, रस्त्याचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी टाळणे, फार मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेला ३०० वर्षांपासूनचा सोने आणि सराफा बाजार याला आकर्षक नवीन स्वरुप देणे इत्यादी बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

पुनर्विकासासाठीचा आराखडा करताना परिसरातील मुंबादेवी मंदिर ट्रस्ट, श्री मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशन, इंडिया बुलीयन ॲड ज्वेलर्स असोसिएशन, कामनाथ मंदिर ट्रस्ट आणि अन्य छोट्या-मोठ्या व्यापारी आस्थापनांना विश्वासात घेतले जावे, असे निर्देशही ॲड. नार्वेकर यांनी दिले. (Latest Marathi News)

या बैठकीत प्रस्तावित नूतनीकरण संदर्भात सादरीकरण करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सी-वार्डचे उद्धव चंदनशीवे, माजी नगरसेवक जनक संघवी, अभियंता मनिष पडवळ, मुंबादेवी ट्रस्टचे चंद्रकांत संघवी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT