Rahul Kanal And Aditya Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Rahun Kanal Resigned: राहुल कनाल यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', ट्वीट करुन व्यक्त केली मनातील खदखद

Rahul Kanal Tweet: राहुल कनाल हे 1 जुलै रोजी म्हणजे उद्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Priya More

निवृत्ती बाबर, मुंबई

Rahul Kanal Statement: ठाकरे गटाला (Thackeray Group) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज ट्वीट करत जाहीररित्या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

राहुल कनाल यांनी ट्विटच्यामाध्यमातून मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल कनाल हे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. राहुल कनाल हे 1 जुलै रोजी म्हणजे उद्या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

राहुल कनाल यांनी आज ठाकरे गटाला राजीनामा दिला. वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सर्व युवासेना युवक पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आल्यानंतर राहुल कनाल यांनी ठाकरे गटाविरोधात पाहिलं ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, 'दुःख होतंय !!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहीत आहे. पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे त्यांना न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही ज्यांनी रात्रं-दिवस काम केलंय. चला चांगले आहे की सर्वांना माहिती पडले की अहंकार काय असतो.'

राहुल कनाल यांनी हे ट्वीट करत आपल्या मनातील दु:ख व्यक्त केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे गट सोडत असल्याचे देखील जाहीर केले आहे. आता राहुल कनाल हे शिंदे गटात जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आदित्य ठाकरे 1 जुलै रोजी म्हणजे उद्या मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहेत. याच दिवशी शिंदे गट त्यांना जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरेंचे चांगले मित्र राहुल कनाल हे शिंदे गटामध्ये उद्याच प्रवेश करणार आहेत.

राहुल कनाल हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अशामध्ये त्यांनी काही महिन्यांपूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रुप देखील सोडला होता. अंतर्गत वादाला कंटाळून त्यांना हा ग्रुप सोडला असल्याचे बोलले जात होते. राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटाचे सावध पाऊल उचलले होते.

राहुल कनाल यांच्या विभागातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली होती. वांद्रे पश्चिममधील युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हे आदेश काढण्यात आले होते. या आदेशानंतर राहुल कनाल यांनी नाराजी व्यक्त करत ट्वीट केले आणि ठाकरे गट सोडत असल्याचे जाहीर केले.

राहुल कनाल हे शिवसेनेत येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा राहुल कनाल यांची शिर्डी संस्थानावर विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. अशामध्ये आता राहुल कनाल यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असून ते लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी युवासेनेचे नेते अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवासेना सोडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT