Darshana Pawar Murder Case Updates Saam TV
मुंबई/पुणे

Darshana Pawar Death Case New Update: प्रेम प्रकरणातूनच दर्शनाची हत्या! तपास झाला पूर्ण, नवीन माहिती आली समोर....

साम टिव्ही ब्युरो

Darshana Pawar Death Case New Update: एमपीएससी टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे.

प्रेम प्रकरणातूनच दर्शनाची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी राहुल हंडोरे यांची सर्व शस्त्र व गाडी जप्त केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने राहुल हंडोरे याने एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) पास झालेल्या दर्शना पवारची हत्या केली होती. १८ जून रोजी दर्शना पवारचा मृतदेह पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. दर्शनाचा मित्र राहुल यानेच तिची हत्या केल्याचं निष्पन्न होता पोलिसांनी त्याला अटक केली होती.  (Latest Marathi News)

दर्शनाने विवाहास नकार दिल्याने तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरने वार करून खून (Crime News) केल्याची कबुली हंडोरेने दिली होती. राहुल हंडोरे याने दर्शनाची हत्या केल्याचं उघड होताच राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

आरोपी राहुल हंडोरे आणि मृत दर्शना पवार यांची लहानपणापासूनच ओळख होता. मामाच्या घराशेजारी राहत असल्याने दर्शना आणि त्याची लहानपणापासूनच मैत्री होती. राहुल हा ४ ते ५ वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. स्वत:चा खर्च चालवण्यासाठी अनेकवेळा डिलीवरी बॉय म्हणून राहुल काम करत होता. कधी कुठे पार्टटाईम जॉब करत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT