Rahul Gandhi Gets Relief as Bhiwandi Court Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi: राहुल गांधींना मोठा दिलासा, जामीनदार बदलला; भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi Gets Relief as Bhiwandi Court: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाने मोठा दिलासा दिला. राहुल गांधी यांचा जामीनदार बदलला. हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांना जामीन दिला.

Priya More

Summary -

  • राहुल गांधींनी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली

  • जुन्या जामीनदाराच्या निधनामुळे नव्याने जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली

  • न्यायालयाने राहुल गांधींचा जामीन मंजूर केला

  • आरएसएसबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. आरएसएसबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. या खटल्यातील एक महत्वाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते आज न्यायालयात उपस्थित राहिले होते. राहुल गांधी यांचे आधीचे जामीनदार आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला होता. आज पुन्हा नव्याने जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

भिवंडी न्यायालयात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात खटला सुरू आहे. राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी भिवंडीतील सोनाळे गावात प्रचार सभा घेतली होती. या सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान राहुल यांनी केल्याचा आरोप आहे. राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याने संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांनी भारतीय दंड संहिता कलम ५०० अन्वये खासगी फिर्याद न्यायालयात खटला दाखल केला होता.

या प्रकरणात फिर्यादीची सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस अधिकारी सायकर यांचीही सरतपासणी नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना माजी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी जामीन दिला होता. काही महिन्यांपूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. त्यामुळे राहुल यांना नवीन जामीन देणे आवश्यक होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांना जामीन दिला. न्यायाधीश पी. एम. कोळसे यांच्या न्यायालयात ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर न्यायाधीशांनी राहुल गांधींना जामीन मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT