Rahul Bajaj Passed Away Saam tv
मुंबई/पुणे

Rahul Bajaj Passes Away: शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; अनेक मान्यवरांनी, उद्योगपतींची हजेरी

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे काल पुण्यात निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे काल पुण्यात निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. बजाज यांचे पार्थिव आज आकुर्डीतील बजाज (Bajaj) कंपनीतील निवासस्थानी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान, राहुल बजाज यांच्या अंत्यदर्शकरिता अनेक राजकीय (Political) वर्तुळातील मान्यवरांनी, उद्योगपतींनी सुद्धा सकाळपासूनच येथे हजेरी लावली आहे. उद्योगपती पद्धविभूषण राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे पार्थिव अंत्यदर्शनाकरिता आकुर्डी येथील बजाज कंपनी येथे असलेल्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. (Rahul Bajaj Passes Away Funeral will be held Government)

हे देखील पहा-

दरम्यान, अंत्यदर्शनाकरिता कंपनीतील कामगार वर्ग तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी बघायला मिळाली आहे. उद्योगपती बजाज यांचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि इतर उद्योगपती यांनी बजाज यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दुपारी ३ नंतर बजाज यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत नेले जाणार असून सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. जवळपास ५ दशकांहून बजाज ऑटोची धुरा यथस्वीपणे खांद्यावर पेलणारे उद्योगपती राहुल बजाज कंपनीच्याच आवारात राहणारे ते एकमेव उद्योजक होते. कामगारांशी आपुलकीने वागणारे बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रामध्ये मोठी हानी झाल्याचे म्हणत कामगार वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरात उद्योग क्रांतीची मुहुर्तमेढ रोवणारा महामेरू निखळला असल्याची भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT