- सचिन बनसाेडे
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला (maratha reservation gr) ओबीसी संघटना तीव्र विरोध दर्शवित आहेत. आज (गुरुवार) अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे ओबीसी बांधवांनी मोर्चा (obc sanghatana morcha in rahata) काढत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. (Maharashtra News)
मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा ओबीसींवर अन्याय करणारा असल्याचा दावा ओबीसी संघटन करु लागले आहेत.
येत्या 3 फेब्रुवारीला ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या नेतृत्वात अहमदनगर येथे एल्गार महासभा होणार आहे. या महासभेसाठी हजारो ओबीसी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समाजाच्यावतीने देण्यात आली.
राहाता शहरात ओबीसी समाज घटकांनी एकत्र येत शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढली. एकच पर्व, ओबीसी सर्व... जो ओबीसी की बात करेगा, वोही देश पे राज कारेगा... नही चलेगी, नहीं चलेगी, घुसखोरी नहीं चलेगी... भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा आंदाेलकांनी दिलेल्या विविध घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिंदे सरकार शासकीय यंत्रणांना हाताशी धरून ओबीसींवर अन्याय करत आहे. भुजबळांना मंत्रिमंडळातून हकलण्याची भाषा करणाऱ्यांना उद्या ओबीसी हकलतील असा इशारा आंदोलकांनी दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.