Demand of RPI directly to PM Modi Saam TV
मुंबई/पुणे

भारतीय चलनावर गौतम बुद्धांचा फोटो लावा; RPI ची थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी

भारत देशाची ओळख गौतम बुद्ध आहेत तसंच जगातील प्रत्येक माणूस भारताला गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

मुंबई : भारत देशाची ओळख गौतम बुद्ध (Gautama Buddha) आहेत तसंच जगातील प्रत्येक माणूस भारताला गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखतो त्यामुळे भारतीय चलनावर तथागत गौतम बुद्धांचा फोटो लावावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांच्याकडे केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्यानंतर देशभरात नोटांवरील फोटोंबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा (BJP) अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जात असल्याचा आरोप देखील असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

तर गुजरात (Gujarat) निवडणुकीच्या निमित्ताने केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड पुढे आणल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या मागणीनंतर भाजपाकडून देखील भारतीय नोटांवरती छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याची देखील मागणी केली आहे. (Shivaji Maharaj, Babasaheb Ambedkar, Vinayak Damodar Savarkar)

याबाबत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि राम कदम यांनी याबाबत ट्विट केलं आहे. राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या नोटेचा फोटोही ट्विट केला आहे.

शिवाय ही आपली वैयक्तिक भावना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे तर राम कदम यांनी देखील चार नोटांते फोटो शेअर केलेत, ज्यामध्ये एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर सावरकर तर चौथ्या फोटोवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आता थेट पंतप्रधानांकडे भारतीय चलनावरती गौतम बुद्धांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. खरात यांनी मागणी करताना म्हटलं आहे की, भारत देशाची ओळख गौतम बुद्ध आहेत.

तसंच जगातील प्रत्येक माणूस भारताला गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखतो आणि भारतातील आजपर्यंत जे पंतप्रधान झाले त्यांनी देखील भारत देश हा गौतम बुद्धांचा असल्याचं मोठ्या अभिमानाने सांगितलं आहे. शिवाय तथागत गौतम बुद्धांनी जगाला पहिल्यांदा लोकशाही दिली. गौतम बुद्ध आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चालनावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो घ्यावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

SCROLL FOR NEXT