Saam Tv Pune News
मुंबई/पुणे

Shocking : 'ससून'मधील मैत्री, अचानक काहीतरी बिनसले; तरुणाकडून तरुणीची हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Pune News : पुण्यात ससून रुग्णालयातील लॅब टेक्निशियन तरुणाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज. पोलिस तपास सुरू असून दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

Alisha Khedekar

  • प्रेमसंबंधातून हत्या

  • तरुणीचा मृतदेह गणेशच्या खोलीत; गणेश तळेगाव ट्रॅकवर मृत

  • दोघेही ससून रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत

  • पोलिस तपासात हत्या घडण्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः देखीलआत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे दोघेही पुण्यातील ससून रुग्णालयात काम करायचे. प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश काळे (वय २१, रा. बीड) आणि दिव्या निगोश (वय २०, रा. येरवडा) असे मृतदेह आढलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संगमवाडी येथे गणेशने दिव्याची(Divya Nigosh) हत्या केली. दिव्या ही मूळची पुण्यातील विमानतळ भागातील वास्तव्यास असून तिचे वडील पोलिस कर्मचारी आहेत. गणेश ( Ganesh Kale ) हा मूळचा बीडचा आहे. दोघेही ससून रुग्णालयात लॅब टेक्नेशियन म्हणून नोकरी करत होते. संबंधित मुलगी ही बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी माहिती मिळताच तरुणीचा तपास सुरु केला. तपासात दिव्याचा मृतदेह गणेशच्या राहत्या खोलीत तर त्याचवेळी गणेशचा मृतदेह तळेगाव रेल्वे ट्रॅकवर आढळून आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक बाब उघडकीस आली. गणेशने आधी दिव्याची हत्या केली, नंतर तळेगाव रेल्वे ट्रॅकवर जाऊन स्वतः आत्महत्या केली. या प्रकरणात दोघांचाही मृत्यू झाला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. मुलीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून या हत्येमागचं मूळ कारण अद्याप समोर आलेलं नाही. दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT