Crime News Update  
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्याच्या तरूणीची बंगळुरूमध्ये हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरला, अन्...

Crime News Update : सततच्या भांडणाला वैतागून नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर महाराष्ट्रात पळ काढला अन् घरमालक आणि सासू-सासऱ्यांना या कृत्याबद्दल माहिती दिली.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Latest News Update : पुण्याच्या तरूणीची बंगळुरूतील फ्लॅटमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गौरी खेडेकरच्या पतीने घरमालकाला फोन करून फ्लॅटमध्ये पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर घरमालकाने पोलिसांना हा प्रकार कळवला.

पती राकेश खेडकर याने पत्नी गौरीचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला. पतीला शिरवळमधून पोलिसांनी अटक केली. पण त्याने विषप्राशन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कौटुंबिक वादातून गळा चिरून हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला. त्यानंतर घरमालकाला आणि सासू सासऱ्याला फोन करून याबाबत सांगितले.

राकेश खेडकर आणि गौरी सांबेकर (३२) यांचे २ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, ते बंगळुरूमधील दोड्डा कम्मनहल्ली येथे राहत होते. दोघेही एका खासगी कंपनीत कामाला होते. वर्क फ्रॉम होम दरम्यान दोघांचात अनेकदा भांडण होत होते. सततच्या भांडणाचा वैताग आल्याने राकेशने पत्नीला ठार मारण्याचे नियोजन केले. रागाच्या भरात राकेशने गौरीच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर गळा चिरून तिची हत्या केली. हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूममध्ये टाकून पळ काढला.

हत्येनंतर राकेश साताऱ्याला पळून आला अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी मिळाली. हुलीमावू आणि पुणे पोलिस यांच्यातील समन्वयाने त्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. त्याला शिरवळ येथून अटक करण्यात आली आहे. मात्र त्याने विष प्राशन केल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तरुणीचा भाओजीवर जीव जडला, लग्नाच्या ३ दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं; सियानंतर उर्मिलाचं हादरवणारं कृत्य

Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये हिट अँड रनचा थरार! मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू; प्रसिद्ध व्यापाऱ्याला अटक

वाढीव वीजबिलांवर मनसे आक्रमक! २ हजार तक्रारींसह महावितरणला इशारा

गावरान पद्धतीची पाथरीची भाजी, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra News Live Update: कोरेगाव भीमा आठवडा बाजारात पुन्हा चोरट्यांचा डाव फसला; दोन सराईत अटक

SCROLL FOR NEXT