Pune Water Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Water Cut: ऐन पावसाळ्यात पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, 'या' भागात पाणीकपात

Pune Water Cut On Thursday In These Area: पुण्याचा दक्षिण भागात गुरवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. पुण्यात बालाजी नगर, कात्रज गाव परिसरात गुरुवारी पाणी येणार नाही.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच माहिती देण्यात आली आहे.

पुण्यातील केदारेश्व पपिंग स्टेशन, कात्रज येथे व्हॉव्हलचे आणि मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर शुक्रवारी उशिरा पाणीपुरवठा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गुरुवारी पाणी येणार नाही आणि शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुण्यातील या ठिकाणी राहणार पाणीपुरवठा बंद

पुण्यात बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रस्ता, वरखडेनगर, भूषण सोसायटी, राजस सोसायटी, कदम प्लाझा परिसार, सुखसागर नगर भाग १ आणि २, आगममंदिर परिसर, संतोष नगर, अंजली नगर या परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचसोबत दत्तनगर, जांभूळ वाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर,मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ मागील परिसर, कात्रज कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभो नगर, गोकुळनगर. साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडी मशीन परिसर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे - पाटील नगर परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच पाणी भरुन ठेवण्यास सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT