Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Hyena Viral Video: पुण्यात प्राइड वर्ल्ड सिटीजवळ तरसाचा वावर; रहिवाशांना सावधगिरीचा इशारा; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: रस्त्यावर वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर वाघ, बिबट्या अनेकदा दिसतात. मात्र, आता या वन्य प्राण्यांचा वावर शहरातदेखील वाढताना दिसत आहे. पुण्यातील लोहेगावमध्ये तरस दिसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune A Hyena Spot On Road Video Viral:

रस्त्यावर वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर वाघ, बिबट्या अनेकदा दिसतात. मात्र, आता या वन्य प्राण्यांचा वावर शहरातदेखील वाढताना दिसत आहे. पुण्यातील लोहेगावमध्ये तरस दिसला आहे. (Latest News)

पुण्यातील प्राईड वर्ल्ड सिटीजवळ लोहेगाव येथील एका रस्त्यावर तरस आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अचानक रस्त्यावर तरस दिसल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिनाशांना पहाटे किंवा रात्री न फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुण्यातील रस्त्यावर फिरणाऱ्या या तरसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत रात्री एक तरस रस्त्यावरुन फिरताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेने तरस जाताना दिसत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूनेच तरस जात असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या एका बाजूला तरस तर दुसऱ्याचा बाजूला माणसे प्रवास करताना दिसत आहे. परिसरातील लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत वर्ल्ड सिटीच्या सोसायटीने सूचना शेअर केली आहे. त्यामध्ये सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले की, प्राईड वर्ल्ड सिटीपासून डी. वाय. पाटील कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरुन तरस जात असल्याचे दिसले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत तरसचा शोध लागला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: घाटकोपर पूर्वमधून पराग शाह विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT