Pune Vehicles Burnt Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Vehicles Burnt: पुण्यात अज्ञाताने पार्किंगमधील गाड्या पेटवल्या, 15 वाहनं जळून खाक

पुण्यात अज्ञात व्यक्तीने पार्किंगमधील गाड्या पेटवल्या. या घटनेत 15 वाहने जळून खाक झाली आहेत.

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यात अज्ञात व्यक्तीने पार्किंगमधील गाड्या पेटवल्या. या घटनेत 15 वाहने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Vehicles Burnt By Unknown Which Are In Parking Case Filed).

नेमकं काय घडलं?

पुण्यात आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुण्यातील शिवणे येथील शिंदे पुलाजवळ, शिवकमल प्रेस्टीज इमारतीच्या पार्किगमधील 13 दुचाकी आणि 2 रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या. सोसायटीच्या पार्किंगमध्ये अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत (Fire) जवळपास 15 वाहनं (Vehicles) पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.

पीएमआरडीच्या अग्निशमन दलाने आग (Fire) विझवली असून सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झालेलं नाही. गाव गुंडांनी स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी ही आग लावली असावी, असा नागरिकांना संशय आहे. सोसायटी पार्किंगमध्ये वाहनांना आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरुये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT