Vaishnavi Hagawane suicide case Saam Tv News
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Death : वैष्णवीची आत्महत्या नाही खूनच? रिमांड कॉपीतून हत्येचा खुलासा? आरोपींच्या कृत्याची होणार चौकशी

Vaishnavi Hagavane Death Case Update : वैष्णवी हगवणेची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. एवढंच नाही तर रिमांड कॉपीतून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे....मात्र वैष्णवीची हत्या असल्याचा संशय का आहे? पाहयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Prashant Patil

पुणे : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालंय. पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिमांड कॉपीतून धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र रिमांड कॉपीत नेमकं काय म्हटलंय?

वैष्णवीची आत्महत्या नाही खूनच?

वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे हत्येचा संशय

बैष्णवीला हत्यारांनी मारहाण केल्याच्या शरीरावर जखमा

नवऱ्यानं दिली वैष्णवीला पाईपानं मारल्याची कबुली

हुंड्यात दिलेलं ५१ तोळं सोनं हगवणेंकडून गहाण

वैष्णवीवर अनन्वित अत्याचार करुन जीवे मारणाऱ्या हगवणेंनी नंतर पळ काढला होता. तेव्हा पासून पोलिस त्यांच्या मागावर होते. मात्र त्यांना पोलिसांपासून वाचवणारे कोण होते? त्यांना कुणी पैसे पुरवले? याचा पोलिसांनी शोध घ्यायचायं. तर वैष्णवीला मारल्यानंतर तुम्ही २ कोटी दिले नाही म्हणून तुमच्या मुलीला मारल्याचं मग्रुर शशांकनं तिच्या वडीलांना म्हटलं होतं. म्हणूनच पोलिसांनी न्यायालयाकडे रिमांड मागितल्यानं त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

वैष्णवीच्या शरीरावरील जखमा तिला बेदम मारहाण करुन तिच्या हत्या केल्याची साक्ष देतायेत. त्यामुळे तिला हालहाल करुन जीवे मारून आत्महत्येचा बनाव रचल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि वैष्णवीचं पोस्ट मार्टेम ज्या ससून हॉस्पिटलमध्ये झालं त्या ससूनचा इतिहास जगजाहीर आहे. म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणी हगवणेसारख्या बड्या धेंड्यांना आणि त्यांच्या या क्रुरकृत्यात साथ देणाऱ्या प्रत्येकाला जन्माची अद्दल घड़वण्याची वेळ आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, जरांगेंनी दिला इशारा

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

Maratha Andolan : मराठा आंदोलकांवरील ८२६ पैकी केवळ ८६ गुन्हे मागे | VIDEO

उल्हासनगरात राजकीय भूकंप; भाजपला झटका, १५ नगरसेवकांच्या पक्षाकडून शिवसेना शिंदे गटासोबत युती जाहीर

SCROLL FOR NEXT