Nilesh Chavan arrested from Nepal border video Saam Tv News
मुंबई/पुणे

Nilesh Chavan Video : नेपाळ बॉर्डवर धरलं, कॉलर पकडून गाडीत बसवलं, वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूल दाखवणाऱ्या निलेश चव्हाणला अटक; थरारक VIDEO

Nilesh Chavan Arrest Video : बंदुकीच्या धाकावर वैष्णवीच्या १० महिन्याचं बाळ स्वतःकडे ठेवणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अखेर नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा अटकेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Prashant Patil

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना एक मोठे यश आलं आहे. बंदुकीच्या धाकावर वैष्णवीच्या १० महिन्याचं बाळ स्वतःकडे ठेवणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अखेर नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा अटकेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

निलेश चव्हाण हा मागील १० ते १२ दिवसापासून फरार होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला होता. निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची पाच पथकं त्याच्या मागावर होती. तो परराज्यात निघून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाण याला ताब्यात घेतलं आहे. उद्या पिंपरी चिंचवड शहर पोलीस निलेश चव्हाण याला कोर्टासमोर सादर करण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक चार पथकाने तसेच गुंडा विरोधी पथक आणि सायबर क्राईम ब्रांचने मिळून संयुक्तपणे निलेश चव्हाण यांना नेपाळ बॉर्डरवरुन ताब्यात घेतलं आहे. निलेश चव्हाणच्या अटकेचा थरार तथा अटकेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT