Pune shocking  Saam tv
मुंबई/पुणे

shocking : सरपंच सासू अन् मुख्याध्यापक सासऱ्याचा जाच असह्य झाला; पुण्याच्या दीप्तीने मृत्यूला कवटाळलं

pune married women ends life : सरपंच सासू आणि मुख्याध्यापक सासऱ्याचा जाचाला विवाहितने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

Akshay Badve

पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

विवाहित महिलेने आयुष्य संपवलं

उरळी कांचनमध्ये घडली घटना

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुन्हा एकदा वर्षभराने पुनरावृत्ती घडली आहे. महाराष्ट्रात विवाहित महिलांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील उरळी कांचनमधील प्रकार समोर आला आहे.

पुण्यात पुन्हा एकदा सासरच्या छळाला कंटाळून विवाहितने आत्महत्या केली आहे. या विवाहितेची सासू सरपंच आहे. तर सासरा मुख्याधापक आहे. विवाहित महिलेने उरळी कांचनमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. दीप्ती चौधरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दीप्तीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

दीप्तीच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत. नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, चारचाकी वाहनासाठी पैशांचा तगादा आणि गर्भपात करण्याचा छळ केल्याने दीप्तीने आयुष्य संपवलं. या प्रकरणानंतर सासू सरपंच सुनीता चौधरी यांच्यासह पती आणि दीराविरोधात उरूळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दीप्तीच्या आत्महत्येने उरूळी कांचनमध्ये खळबळ उडाली आहे.

दीप्ती रोहन चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणानंतर हेमलता बाळासाहेब मगर यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आत्महत्या, सासूरवासाचा छळ या कलमांतर्गत गुन्हा झाला आहे. दीप्तीचा विवाह रोहन चौधरीसोबत झाला. कुटुंबातील पती, सासरे, सासू, दीर यांच्याकडून दीप्तीकडे पैशांची मागणी केली जात होती. चारचाकीसाठी देखील पैशांची मागणी व्हायची. गर्भपातानंतरही दीप्तीचा छळ सुरू होता. याच छळाला कंटाळून दीप्तीने राहत्या घरात आयुष्य संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदनामीचा आरोप खोटा, नगरसेवकांच्या सुरक्षिततेसाठीच पोस्टर; गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: राजकारणात मोठी घडामोड; बार्शीनंतर आणखी एका ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र,भाजपचं वाढलं टेन्शन

मालाड रेल्वे स्थानकात रक्ताचा सडा, क्षुल्लक कारणावरुन प्राध्यापकाची हत्या

महायुद्धाचा काउंटडाउन सुरु? ट्रम्पची धमकी, खोमेनी बंकरमध्ये?

संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, सहर शेखच्या समर्थनार्थ जलील मैदानात

SCROLL FOR NEXT